Krushi Sevak Recruitment 2023 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) अंतर्गत कृषी सेवकांच्या 02588 जागांपैकी तब्बल 01882 जागा भरल्या जात आहेत. सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक सरळसेवेने स्पर्धा परिक्षेव्दारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये होत आहे. कृषीसेवक भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
◾अर्जदार उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
◾भरती केलेल्या पदाचे नाव : कृषीसेवक (Krushi Sevak)
◾टोटल पदे (Total Posts) : तब्बल 01882 पदे भरण्यात येणार आहेत.
◾भरती श्रेणी : सरकारी (Government) नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾पात्रता : मूळ जाहिरात वाचा. (खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.)
◾महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे.
◾कृषीसेवक भरतीची सर्व जिल्ह्यांच्या पुर्ण जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
सर्व जिल्हा जाहिराती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धति : ऑनलाईन (Online).
◾उमेदवारांचे वय : जाहिरातीत नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जाहिरात प्रसिध्द केल्याच्या तारखेस गणण्यात येईल.
◾शैक्षणिक पात्रता : सांविधिक विद्यापीठाची कृषी विषयामधील पदविका किंवा पदवी किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता. (शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पुर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत.) उपरोक्त नमूद शैक्षणिक अर्हतेशिवाय अर्ज करणारे उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत
◾भरतीसाठी निवड पद्धत : सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾कृषी सेवक भरती पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक वरती पहा.