Anti Corruption Bureau Bharti 2024 : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Maharashtra Anti Corruption Bureau) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवर खालील रिक्त पदे मानधन पध्दतीने नियुक्तीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Anti Corruption Bureau Bharti 2024 : Maharashtra Anti Corruption Bureau (Maharashtra Anti Corruption Bureau) has announced new vacancies.
◾महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अपर पोलीस अधीक्षक (मुख्या-२) व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारे जाहिरात झाली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : 28,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾भरती सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वय : 1] खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे. 2] मागासवर्षे – 43 वर्षे. वय असणे आवश्यक आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾भरती कालावधी : सदर पदांची नेणमुक ही पूर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल.
◾या पदांची भरती : विधि अधिकारी गट-ब
◾एकूण पदे : 08 रिक्त पदे.
◾अटी व शर्ती :-▪️ उमेदवारांनी कोणत्याही एकाच परिक्षेत्राकरीता विनंती अर्ज सादर करावा. एक पेक्षा अनेक जिल्हयांकरीता सादर केलेल्या उमेदवारांचा विनंती अर्ज कोणत्याही एकाच जिल्हयाकरीता विचारात घेण्यात येईल व इतर विनंती अर्ज रद्द ठरविण्यात येतील.▪️सदर नेमणुका या करार पध्दतीने प्रथमतः ११ महिन्यांसाठी करण्यात येतील. ११ महीन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी (जास्तीत जास्त ३ वेळा प्रत्येकी, ११ महिन्याकरिता) वाढविता येईल. ३ वेळा मुदत वाढ दिल्यानंतर अशा उमेदवारास पुनःश्च निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.▪️कंत्राटी पध्दतीने नेमणूक करावयाच्या “विधी अधिकारी गट-ब” या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीचे वेळी ६० वर्षा पेक्षा जास्त नसेल.▪️सदर अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदावारांना मुलाखातीसाठी बोलविण्यात येईल. मुलाखातीचा दिनांक व वेळ व ठिकाण नंतर कळविण्यात येईल.▪️उमेदवाराला कोणताही प्रवास खर्च देण्यात येणार नाही.▪️नियुक्ती केलेल्या उमेदवारास या कार्यालयामार्फत देण्यात येणारा करारनामा (Agreement) रु. १००/- शुल्काच्या मुद्रांकावर (बॉण्ड पेपरवर) करणे अनिवार्य आहे.▪️करार पध्दतीने नेमणुक करण्यात येणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना एकत्रित वेतन व भत्ते अनुज्ञेय दुरध्वनी व प्रवास खर्चा व्यतिरिक्त (उपरिनिर्दिष्ट मर्यादेपेक्षा) इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.▪️उमेदवारांची ११ महिन्याच्या कंत्राटी पध्दतीने नेमणुक करण्यात येईल, नियुक्ती केलेल्या उमेदवारांस म. ना. से. रजा नियम तरतुदीनुसार कोणत्याही प्रकारची रजा देय असणार नाही.
◾Last Date to Apply : 08 फेब्रुवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी, मुंबई (लक्षवेधः-अपर पो. अधीक्षक (मुख्या-२).