Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. राज्यातील अग्रगण्य शेड्यूल्ड सहकारी बँकेत नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहेत. 8 जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत. शैक्षणिक पात्रता 7वी, 8वी, 10वी, 12वी व पदवीधर पास उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. सुरक्षारक्षक, शिपाई, वाहनचालक तसेच लिपिक पदांची भरती केली जात आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात पुर्ण वाचावी. ऑनलाईन अर्ज लिंक व पुर्ण जाहिरात खाली दिली आहे.
Bank Bharti 2024 : If you are looking for a job in a bank then there is a good opportunity for you. The leading scheduled co-operative bank of the state has started recruitment for new posts.
◾भरती पदाचे नाव : शिपाई, सुरक्षारक्षक, वाहनचालक व लिपिक.
◾जिल्हा नागरी सहकारी बँक्स् को-ऑप. असोसिएशन लि. यांच्या द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 7वी, 8वी, 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.
◾एकूण भरण्यात येणारी पदे : 209 पदे.
◾बँक भरतीची जाहिरात व आँनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची पद्धत आहे.
◾वयोमर्यादा : 21 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार (मूळ जाहिरात वाचा.)
◾नोकरी ठिकाण : सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुर्ण मुंबई या जिल्ह्यांमध्ये भरती केली जात आहे.
◾महत्वाचे : १) परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्यानंतर अर्ज सादर (Final Submission) केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी. २) उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक असावा, जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध आणि सक्रिय राहिला पाहिजे. तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. तसेच ई-मेल आय.डी. व संदेशवहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना असोसिएशन व बँक जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रियेदरम्यान असोसिएशनच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करुन भरतीप्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
◾Last Date to Apply : ०५ फेब्रुवारी २०२४.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.