मुंबई महानगरपालिका मध्ये चांगल्या वेतनाची नोकरी मिळवा! जाहिरात प्रसिद्ध.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन नोकरी शोधताय? तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. लो. टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढी या विभागातील रक्त संक्रमण अधिकारी या संवर्गातील 02 पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर एकावेळी तीस दिवसांपेक्षा जास्त नाही इतक्या कालावधीकरीता प्रत्येक 29 दिवसांनंतर एक दिवस सेवाखंड देऊन पुर्ननेमणुक अशा स्वरुपात अर्हताधारक उमेदवाराकडून वॉक-इन-सिलेक्शन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. रक्त संक्रमण अधिकारी पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेत स्थळावरुन अर्जाच्या नमुन्याची प्रत (Print) काढून त्यासोबत शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून सदर अर्ज लोटिमस रुग्णालय, कॉलेज इमारत, तळमजला, रुम नं. 15, रोखपाल विभाग येथे रुपये 640 +18% जीएसटी रु.115/- एकूण रु.756/- (रुपये सातशे छप्पन फक्त) इतके शुल्क दि. 13.02.2024 ते 20.02.2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत (शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत भरण्यात यावेत. पूर्ण माहिती भरलेल्या अर्जासोबत शुल्काची पावती तसेच शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून लो. टि. म.स. रुग्णालयाच्या आवक/जावक विभागात दि. 20.02.2024 पर्यंत सादर करावेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.