Krushi Sevak Bharti 2023 : कृषी विभागात नोकरी शोधत आहात? महाराष्ट्र शासन अंतर्गत कृषी सेवकांच्या 02588 जागांपैकी तब्बल 01882 जागा भरल्या जात आहेत. कृषीसेवक पदांची कृषी विभागात मोठी भरती प्रक्रिया आजपासुन सुरू झाली आहे. नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी विभागांत सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक सरळसेवेने स्पर्धा परिक्षेव्दारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. कृषीसेवक भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
◾भरती केलेल्या पदाचे नाव : कृषीसेवक (Krushi Sevak) या पदांसाठी भरती केली जात आहे.
◾अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
◾एकूण भरण्यात येणारी पदे (Total Posts) : तब्बल 01882 पदे भरण्यात येणार आहेत. ही चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : सरकारी (Government) नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾पात्रता : मूळ जाहिरात वाचा.
◾महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
सर्व जिल्हे जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धति : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू : दिनांक 14 सप्टेंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾वय : जाहिरातीत नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जाहिरात प्रसिध्द केल्याच्या तारखेस गणण्यात येईल.
◾भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता : सांविधिक विद्यापीठाची कृषी विषयामधील पदविका किंवा पदवी किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता. (शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पुर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत.) उपरोक्त नमूद शैक्षणिक अर्हतेशिवाय अर्ज करणारे उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत
◾भरतीसाठी निवड पद्धत : सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾कृषी सेवक भरतीच्या अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.