पुर्ण शासन निर्णय (GR) पहा. | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
Krushi Sevak Bharti 2023 : राज्यातील सततची दुष्काळसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी व वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याच्या दृष्टीने कृषि सहाय्यकांची पदे दरमहा रु.२५००/- इतक्या निश्चित वेतनावर ( एकत्रित मानधन) कृषि सेवक म्हणून भरणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला होता. तद्नंतर सन २००९ मध्ये लागू करण्यात आलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार नियमित कृषि सहायकांच्या वेतनात वाढ झाली. नियमित कृषि सहाय्यकांची सर्व कर्तव्ये व जबाबदाऱ्या कृषि सेवक पार पाडत असल्यामुळे संदर्भ क्र.३ येथील दि. १९.०३.२०१२ च्या शासन निर्णयान्वये कृषि सेवकांच्या निश्चित वेतनात ( एकत्रित मानधन) रु. २५००/- वरुन रु.६०००/- एवढी वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून कृषि सेवक रु.६०००/- एवढया निश्चित वेतनावर काम करत आहेत. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने कृषि सेवकांच्या निश्चित वेतनात ( एकत्रित मानधन वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना व कृषि सेवकांकडून करण्यात येत आहे. तद्नुषंगाने मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दि. २२.०९.२०२२ रोजी आयोजित बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या कृषिसेवकांच्या निश्चित वेतनात ( एकत्रित मानधन वाढ करण्याच्या प्रस्तावावर मा. मंत्रीमंडळाच्या दि.२७.०७.२०२३ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार कृषिसेवकांच्या निश्चित वेतनात (एकत्रित मानधन वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता शासनाने मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.