सर्व योजना, शासन निर्णय (GR), शेती माहितीसाठी | येथे क्लीक करा |
PM किसान योजना 2023 : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे अनेक हप्ते आत्तापर्यंत देण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठीची कार्यवाही महसूल विभागाने केली होती. स्पानंतर मध्यंतरी त्या विभागाकडून कृषी विभागाकडे त्या योजनेचे कामकाज हस्तांतरित केल्याचे सांगितले. मात्र, कृषी विभागालाही वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना नसल्याने त्यांनी ती जबाबदारी आमच्याकडे नसल्याचे सांगून पुढे कार्यवाहीच केली नाही. दोन्ही विभागांच्या कात्रीत शेतकरी सापडले होते. शेतकरी महसूलकडे गेले, की त्यांना कृषी विभागाकडे पाठवले जात होते. कृषी विभागाकडे गेल्यावर आम्हाला सूचना नाही लॉगीन आयडी पासवर्ड नाही, असे सांगण्यात येत होते. त्यात दोन वर्षे गेल्याने नवीन शेतकऱ्यांची नोंदणी रखडली होती. त्याचा विचार करून आता शासनाने संबंधित जबाबदारी महसूल विभागाकडे दिली आहे. त्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. त्याद्वारे नवीन नावनोंदणी, तांत्रिक दुरुस्ती, ज्यांना पहिला हप्ता आला आहे, मध्येच ते हप्ते थांबले आहेत, अशांची दुरुस्ती करण्याची कार्यवाही सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची सोय होत आहे.