Nuksan Bharpai Maharashtra 2023 List : राज्यात खरीप पीक विमा योजनेत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाते. हा निकष गृहीत धरूनच राज्यातील तेरा जिल्हयातील ५३ मंडळांमध्ये पिकांच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश कृषी आयुक्त यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार आहे. राज्यात उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यात पेरण्या रखडल्या. आतापर्यंत ९१ टक्के अर्थात १ कोटी ३२ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. कोणत्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार ते खाली पहा.
येथे वाचा ➡️ फक्त या शेतकऱ्यांना मिळणारं नुकसान भरपाई!
राज्यात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारली. हा कालावधी अनेक ठिकाणी दोन आठवड्यांपेक्षा अधिक आहे. याचा थेट परिणाम सोयाबीन, कापूस, तूर, भात या महत्त्वाच्या पिकांवर झाला आहे. राज्यातील १३ जिल्ह्यामधील ५३ मंडळांमध्ये पावसाचा खंड हा २२ ते २५ दिवसांचा झाला आहे.
कोणत्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणारं त्यांची यादी! पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
Nuksan Bharpai Maharashtra 2023 List : पिकांच्या वाढीवर तसेच उत्पादनावर परिणाम होईल, असे कृषी अधिकाऱ्यांची म्हणणे आहे. प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत राज्याने यंदा एक रुपयात पीक विमा काढला आहे. शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई म्हणून यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या मंडळांमधील पिकांच्या सर्वेक्षणाचे निर्देश दिलेत. त्याचा अहवाल विमा कंपन्यांना देऊन अधिसूचना काढली आहे.