शिक्षक भरती 2023 : मोठ्या शिक्षक भरतीची वाट पाहत आहात? तुमच्यासाठी खूशखबर आहे. राज्यात तब्बल 50 हजार नव्या शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षक तर दुसऱ्या टप्प्यात २० हजार शिक्षकांची भरती होईल. शिक्षक भरतीबाबत न्यायालयात याचिका असल्याने अडचणी येत होत्या मात्र, आता स्थगिती उठल्याने शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही भरती पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी निवृत्त शिक्षकांची जिल्हा परिषदेमार्फत भरती करण्यात येत आहे. शिक्षक भरती बाबतीत अधिकृत अपडेट (जाहिरात) खाली पहा.
50,235 शिक्षक भरती मोठी अपडेट (जाहिरात) | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
Shikshak Bharti 2023 : राज्यात खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांना राज्य सरकारकडून शंभर टक्के निधी दिला जातो. या शाळांना सरकारी शाळेचा दर्जा मिळाल्यास केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ मिळू शकतात. देशात महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश वगळता इतर सर्वत्र राज्यांत याच पद्धतीने शाळा सुरू आहेत. त्यामुळे शाळांना सरकारी दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
पुणे येथे शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी केसरकर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. निवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. या अनुषंगाने प्रस्तावित शिक्षक भरतीबाबत केसरकर म्हणाले, की शिक्षक भरतीबाबत न्यायालयात याचिका असल्याने अडचणी आल्या. मात्र, आता स्थगिती उठल्याने शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी परीक्षा झाली असून, पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध आहे. त्यामुळे तातडीने प्रक्रिया राबवून भरती पूर्ण करण्यात येईल. शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षण सेवकांची मानधन वाढ करण्यात आली.