Shikshan Vibhag ZP Bharti 2023 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजना, शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील रिक्त असणारी डेटा एन्ट्री ऑपरेटरची पदे एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत. इच्छूक व पात्र उमेवारांकडून अर्ज मागिवण्यात येत आहेत. 12वी, पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजना मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 12वी पास उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
◾भरती विभाग : अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर.
◾शैक्षणिक पात्रता : किमान इयत्ता 12 वी पास आवश्यक आहे. पदवीधर उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
◾वेतन/ मानधन : दरमहा रु. 20,650/- रु मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभाग भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
पुर्ण अर्ज | येथे क्लीक करा |
◾वयोमर्यादा : किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे दरम्यान असावे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾भरती कालावधी : 11 महिन्याच्या कालावाधीकरीता कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधनावर भरण्यात येणारी रिक्त पदांची स्थिती खालीलप्रमाणे
◾अर्ज शुल्क: रु. ५००/-
◾व्यावसायिक पात्रता : (१) किमान इयत्ता 12 वी पास आवश्यक पदवीधर उमेदवारास प्राधान्य (२) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. (३) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (४) MS-CIT ही परीक्षा किंवा केंद्र शासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : भंडारा
◾निवड पध्दती : 1] डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास इयत्ता 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि इय्यता 12 वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची सरासरी काढण्यात येईल. तसेच एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला 10 गुण बोनस देण्यात येतील. 2] अनुक्रमांक “अ” मध्ये विषद केल्याप्रमाणे गुणांकन करुन उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परीक्षेकरीता एक पदासाठी गुणानुक्रमे 12 उमेदवार बोलावण्यात येतील. सदर उमेदवारांची मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि संगणक ज्ञानाची प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येईल, यासाठी सर्व मिळून 100 गुण देण्यात येतील. सदर प्रात्याक्षित परीक्षेमध्ये किमान 50 गुण प्राप्त करणारे उमेदवार “डेटा एन्ट्री ऑपरेटर” च्या पदावरील निवडीसाठी पात्र राहतील.
◾उमेदवारांसाठी सुचना :▪️अजांसोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय प्रमाणपत्र प्रवर्ग निहाय जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, संदर्भातील कागद पत्रांच्या झेरॉक्स प्रती स्व स्वाक्षांकित (self attested) करुन जोडाव्यात.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, भंडारा यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.