खूशखबर! वनरक्षक भरती 2024 : मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर! | Vanrakshak Bharti 2024 Physical Test

Vanrakshak Bharti 2024 : तुम्ही वनरक्षक भरतीच्या मैदानी चाचणीची वाट पहात आहात? तुमची प्रतिक्षा संपली आहे. महत्वाची सूचना व पत्रक (वेळापत्रक) जाहीर केले आहे. महाराष्ट्र वनविभाग मध्ये माहे जून 2023 पासून तब्बल 02417 पदांची भरती राबविण्यास सुरुवात झाली होती. या भरतीमध्ये जवळ 70 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षा (Written Exam) दिली होती. ज्या उमेदवारांना 45 टक्के पेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना शारिरीक चाचणी व कागदपत्र तपासणी करीता बोलाविले जाणार आहे. 54 गुणांच्या पुढे गुण असणा-या सर्व उमेदवार शारिरीक चाचणी व कागदपत्र तपासणी करीता पात्र असणार आहेत. वनरक्षक भरती 2024 चे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे ते खाली दिले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanrakshak Bharti 2024 : या भरतीमध्ये मुलांना मैदानी चाचणीसाठी 5 किलोमीटर अंतर 80 मार्क्स साठी आहे. 17 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स मिळतील तर मुलींना मैदानी चाचणीसाठी 3 किलोमीटर अंतर 80 मार्क्स साठी आहे. 12 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स मिळतील. लेखी परीक्षा व मैदानी चाचणी यांचे गुण एकत्रित करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. पुर्ण वेळापत्रक खाली दिले आहे.

◾वनरक्षक भरती तपासणीचे दैनंदिन वेळापत्रक, हे वनविभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
◾तपासणीचा दिनांक व स्थळ, प्रत्येक उमेदवाराला ई-मेल व्दारे वेगळयाने कळविण्यात येत आहे.
◾सर्व संबंधित, शारिरीक पात्रता व कागदपत्र तपासणीमध्ये पात्र ठरणा-या उमेदवारांना, धावचाचणीकरीता वेगळयाने बोलविण्यात येईल.
◾कागदपत्र तपासणी व शारीरिक चाचणी वेळापत्रक खाली दिले आहे.

मैदानी चाचणी, कागदपत्र
तपासणी व
शारीरिक चाचणी
वेळापत्रक पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

◾अनिवार्य कागदपत्र सुची खालील प्रमाणे आहे. तपासणी करीता मुळ कागदपत्रासह आणि एक जादाचे स्वसाक्षांकीत (Self Attested) छायांकित प्रती आवश्यक आहेत : १) प्रवेशपत्र २) परिक्षा केंद्रावरील ओळखपत्र ३) ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत ४) शैक्षणिक पात्रता/उच्च शैक्षणिक पात्रता संबंधीत कागदपत्रे (जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे) ५) वयोमर्यादे बाबत दाखला (जन्म प्रमाणपत्र / माध्यमिक शालांत प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला) ६) समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र ७) जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र ८) महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र) ९) नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास) १०) सक्षम प्राधिका-याचे आ.दु.घ. (EWS लागू असल्यास) प्रमाणपत्र ११) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (जाहिरातीतील परिशिष्ट-३ प्रमाणे) १२) अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांकरीता जात पडताळणी प्रमाणपत्र (Cast Validity Certificate) अनिवार्य आहे. १३) आत्महत्या ग्रस्त शेतक-याचे पाल्य असल्यास तसे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र १४) आधार कार्ड ◾वरील प्रक्रियेमधील वेळोवेळी अद्यावत होणाऱ्या बाबी हया www.mahaforest.gov.in या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. अधिक माहितीसाठी वरील लिंक वर क्लीक करा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.