PM Kisan Yojana 2023 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केली. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारद्वारे नोंदणीकरण तथा खात्याचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर जमा केली जाते. पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे. जी देशातील सर्व भूमिधारक शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी साहाय्य करते. शेतकऱ्यांच्या सन्माननीय जीवनासाठी मदत म्हणून ही योजना सुरू झाली. या योजनेच्या लाभार्थ्यांचे संपूर्ण आर्थिक दायित्व केंद्र सरकार उचलते. त्या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून देण्यात येणारी एकूण सहा हजारांची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात २००० रुपयांच्या तीन हप्त्यात जमा केली जाते. अधिकृत माहिती खाली पहा.
PM Kisan Yojana 2023 : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची नवीन नावनोंदणी आणि तांत्रिक दुरुस्ती करण्याची कार्यवाही महसूलने करायची की कृषी विभागाने यात दोन वर्षे घोडं अडलं होतं. मात्र शासनाने आता महसूल विभागानेच ती कार्यवाही करावी, असे सूचित केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची नवीन नावनोंदणी आणि तांत्रिक दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. त्याद्वारे कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. अधिकृत माहिती खाली पहा.
PM किसान योजना अधिकृत माहितीसाठी | येथे क्लीक करा |
शेतकऱ्यांना अनेकदा पीएम किसानचा हप्ता येत नाही, अनेकदा त्यांचे आधार कार्ड लिंक असूनही पैसे येत नाहीत, एकाच्या खात्यावर दुसऱ्याच कोणाचा अकाऊंट नंबर पडलेला असतो, त्यामुळे पैसे जमा होत नाहीत, काही शेतकरी मृत असूनही त्यांचे पैसे येतात. मात्र, त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्याने वारसांना पैसे काढता येत नाहीत, यासह अनेक तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांना भेडसावतात. त्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम आता संबंधित केंद्रातून केले जाणार आहे.