Shikshak Bharti 2024 : राज्यात तब्बल 23,000+ पदांच्या शिक्षक भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. (शिक्षक भरती 2024). ही भरती राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये होत आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या मान्यतेनुसार शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीच्या जाहिराती शिक्षण विभाग व्दारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिराती अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. सर्व जाहिराती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देण्यात आली आहे.
◾महाराष्ट्र शिक्षण विभाग व्दारे या भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहेत
◾सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक. (1ली ते 12वी शिक्षक)
◾इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील.
◾अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली च्या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
◾पुर्ण जिल्ह्यांच्या जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
सर्व जिल्हा जाहिराती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online)
◾भरती करण्यात येणारा कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾व्यावसायिक पात्रता : 1] इ. 1 ली ते इ 5 वी व इ 6 वी ते इ 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी -2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. 2] इ.6 वी ते इ 8 वी या गटातील इतिहास/भूगोल/सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिकशास्त्र विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 3] इ.6 वी ते इ 8 वी या गटातील विज्ञान/गणित/गणित-विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 4] इ.6 वी ते इ 8 वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी कोणताही विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 5] इ. 9 वी ते इ 10 वी / इ 11 वी ते इ 12 वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : लवकरच अपडेट करण्यात येईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.