शिक्षक भरती 2024 : महाराष्ट्र राज्यात तब्बल 23,000+ शिक्षक पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदासाठी भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मोठ्या शिक्षक भरतीची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. ही भरती राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये होत आहे. प्रत्येक शाळेमध्ये नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिराती अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्या. सर्व जिल्ह्यातील जाहिराती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली आहे.
Shikshak Bharti 2024 : As many as 23,000+ teacher posts are vacant in the state of Maharashtra. Advertisements have been released for the recruitment of that vacant post. Good opportunity for candidates who are waiting for big teacher recruitment.
◾भरती करीत पदाचे नाव : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक. (1ली ते 12वी शिक्षक) या पदांसाठी ही भरती केली जात आहे.
◾भरती विभाग : राज्य सरकारच्या पवित्र प्रणाली व्दारे ही भरती केली जात आहे.
◾अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली च्या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
◾या मोठ्या शिक्षक भरतीच्या जवळजवळ सर्व जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
सर्व जिल्ह्यातील जाहिराती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾इ. 1 ली ते इ 5 वी व इ 6 वी ते इ 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी -2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
◾इ.6 वी ते इ 8 वी या गटातील इतिहास/भूगोल/सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिकशास्त्र विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾इ.6 वी ते इ 8 वी या गटातील विज्ञान/गणित/गणित-विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾इ.6 वी ते इ 8 वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी कोणताही विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾इ. 9 वी ते इ 10 वी / इ 11 वी ते इ 12 वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : लवकरच अपडेट करण्यात येईल.